about-group-03
उद्योजकतेचे धडे मराठीतून...

उद्योग idea - ध्यास उद्योजकतेचा!

student
आमच्या विषयी

महाराष्ट्रीयन युवक- युवती नोकरीचा हट्टहास न धरता उद्योग व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत , परंतू व्यवसाय चालू करण्यासाठी किवा तो यशस्वी चालवा यासाठी जे ज्ञान त्यांना हवे असते ते न मिळाल्याने किवां व्यवसाय करतांना काय करावे व काय करू नये हे न समजल्यामुळे बऱ्याच उद्योजकांचे आर्थिक नुसकान तर होतेच परंतू आयुष्यातील खूप महत्वाचा वेळ सुद्धा वाया जातो, व त्यांच्या मनात उद्योजकते विषयी नूनगंड निर्माण होतो, म्हणून आम्ही लेखन, ग्राफिक्स आणी व्हिडीओ च्या माध्यमातून त्यांना उपयुक्त माहिती त्याच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो.

book
आमचा हेतू

तरुणाई मध्ये उद्योग विषयी रुची निर्माण करण्यासाठी सोशल मिडिया च्या माध्यमातून उपयुक्त माहिती मराठी भाषेतून त्यांच्या पर्यंत उपलब्ध करून देणे.

reward
आमची विचारसरणी

व्यावसाईक फायदा किवां पैसे कमवण्यासाठी आम्ही कोणाचीही फसवणूक करत नाही, किवा आमच्या वेगवेगळ्या माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करत नाही.

काय | कशे | कशासाठी

आमच्या कामाचे स्वरूप

जागृती

महाराष्ट्रियन तरुणा पर्यन्त उद्योग विषयी माहिती पोहचून त्यांना उद्योग व्यवसाय चालू करण्यासाठी प्रेरित करणे व वेगवेगळ्या संस्था, व्यक्ति व उद्योजकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे. 

shape-07-02

व्यासपीठ

मार्केटिंग, जाहिरात, डीलर शिप देणे, फ्रेंचाईज देणे, मशीनरी व कच्चा मालाची माहिती प्रसारित करणे यासारख्या उपयुक्त गोष्टीसाठी उद्योग idea चे माध्यम वापरुन तुम्ही तुमचा तुमचा व्यवसाय वाढवु शकता. 

सेवा

उद्योग चालू करण्यासाठी किंवा वाढीसाठी आवश्यक सेवा  जशे की उद्योग नोंदणी, प्रकल्प अहवाल, मार्गदर्शन, ट्रेनिंग, कर्ज, व डिजिटल मार्केटिंग या सारख्या सेवा प्रधान करणे. 

shape-04-07
mission-gallery-01
mission-gallery-02
mission-gallery-03
mission-gallery-04
OUR MISSION

उद्योग idea ची उद्दिष्टे

  1. महाराष्ट्रीयन युवक युवतींच्या मनामध्ये उद्योजकतेचे महत्त्व आणि त्याची गरज याविषयी जागरुकता निर्माण करणे.
  2. नोकरीचा हट्ट न धरता उद्योजकतेप्रती समाजात रुची आणि आस्था निर्माण करणे.
  3. सर्वांना सरकारी वा खासगी नोकऱ्या मिळणे शक्य नाही. तेवढ्या नोकऱ्यांची संधी निर्माण होणे अवघड आहे; पण म्हणून युवा पिढीने निराश व्हायचे कारण नाही. त्यांच्यासाठी उद्योजकतेचा आणि स्वयंरोजगाराचा पर्याय नक्कीच उपलब्ध आहे, हे युवा पिढीवर ठसविणे.
  4. उद्योजकतेचे विश्व किती व्यापक आहे, विशाल आहे आणि भरपूर वाव देणारे आहे हे युवापिढी समोर मांडणे.
  5. युवा पिढीतील आणि समाजाच्या विविध घटकांतील सृजनशीलता, कल्पकता, काही तरी नवीन करण्याची ओढ, याला सुयोग्य दिशा (डायरेक्शन) देणे.
  6. उद्योजकतेबाबत उपयुक्त मार्गदर्शनपर अभ्यासक्रम किंवा कोर्सची आखणी करणे, त्याची अंमलबजावणी करणे. उद्योजकतेकडे लोकांनी वळावे यासाठी त्यांना प्रेरित करणे (मोटिव्ह), त्यासाठी त्यांना उत्तेजन देणे.
  7. समाजातील संभाव्य उद्योजक किंवा उद्योजकतेकडे वळू शकणारे लोक हेरणे, त्यांना एकत्र करणे व प्रशिक्षण देणे.
  8. उद्योजकीय उपक्रम यशस्वी होण्यासाठी आवश्यक ते संघटन व व्यवस्थापकीय प्रशिक्षण देणे.
  9. प्रशिक्षित उमेदवारांना प्रशिक्षणानंतर त्यांचा उपक्रम / उद्योग सुरू करण्यासाठी सर्व प्रकारचे साह्य करणे. यामध्ये प्रकल्प अहवाल तयार करणे, वित्तीय संस्थेकडून वित्त साहाय्य मिळवून, उद्योग वाढीसाठी मार्केटिंग आणी विक्री यासाठी मदत करणे, उद्योजकांना आपल्या उद्योग धंद्याची वेबसाईट तयार करून देणे, याच बरोबर उद्योग वाढीसाठी आवश्यक सेवा व सुविधा पुरवणे ई.
  10. फेसबुक ग्रुप, ग्रुप यांच्या माध्यमातून उद्योजकांना एकत्र आणणे व त्याच्या उत्पादन व सेवा साठी जाहिरात मध्यम उपलब्ध करून देणे
OUR SERVICES

उद्योग idea च्या सेवा व सुविधा

  1. व्यवसाय चालू करण्यासाठी किवा वाढीसाठी मार्गदर्शन प्रदान करणे.
  2. व्यवसाय चालू करतांना आवश्यक नोंदणी जशे कि व्यवसाय नोंदणी, कंपनी रजिस्ट्रेशन, शॉप Act नोंदणी, जी.एस.टी नोंदणी, तसेच इतर आवश्यक नोंदणी व सर्टिफिकेट काढण्यासाठी मदत करणे.
  3. व्यवसाय प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे व वैयक्तिक प्रशिक्षण देणे.
  4. व्यवसाय वाढीसाठी वेबसाईट तयार करणे व डिजिटल मार्केटीग हि सेवा पुरवणे.
  5. व्यवसायासाठी आवश्यक ग्राफिक्स, व्हिडीओ जाहिरात, प्रोडक्ट फोटो शूट तसेच डॉकुमेट्री तयार करणे.
  6. बँक व इतर संस्था च्या माध्यमातून व्यावसाईक कर्ज उपलब्ध करून देणे.
  7. व्यवसाय संदर्भातील पुस्तके, मासिके तसेच ईबुक व्यावसाईकांना उपलब्ध करून देणे.
+
Facebook Follower
+
INSTAGRAM FOLLOWER
+
MONTHLY POST
+
ONLINE INSTRUCTOR
shape-04-03
TESTIMONIALS

Students Feedback

We are committed to continuous improvement and strive to provide a learning environment.

People Love To Learn With Us

90%

Students Complete Course Successfully

9/10

Users reported better learning outcomes.